नीलेश निमकर - लेख सूची

प्रश्न शिक्षणाच्या गुणवत्तेचा!

शालेय शिक्षणाची गुणवत्ता म्हणजे नेमके काय या बाबत बरीच मतमतांतरे असली तरी, सध्या ती फारशी बरी नाही, याबाबत तज्ज्ञ आणि सामान्य या दोघांतही एकवाक्यता असल्याचे दिसते. गेल्या काही दशकांत राज्यातली शाळांची यंत्रणा फार वेगाने विस्तारली आहे. काही अतिदुर्गम भागांचा अपवाद वगळला तर जवळ शाळा नाही म्हणून शिक्षण मिळत नाही अशी स्थिती नक्कीच नाही. ग्रामीण भागात …

वर्गांतर्गत प्रक्रियेची गुणवत्ता

‘शिक्षणाची गुणवत्ता’ याची नेमकी व्याख्या करणे अवघड असले तरी गुणवत्तेची एक ढोबळ कल्पना आपल्या सर्वांच्याच मनात असते. त्या कल्पनेत शाळेतील भौतिक सविधांपासून ते मुलांच्या यशापयशापर्यंतच्या अनेक बाबींचा समावेश असतो. आपल्या जनातल्या कल्पनेच्या आधारेच आपण शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत, समाधान, असमाधान, चता वगैरे व्यक्त करत असतो. गणवत्तेच्या या आपल्या कल्पनेत मुलांना कसे शिकवले जावे, वर्गातले वातावरण कसे असावे, …